कापूरहोळ परिसरात खळबळ ! पुलाखाली सापडला अज्ञात युवकाचा मृतदेह !! घटनेनंतर नागरिकांची गर्दी
कापूरहोळ : पुणे-बेंगलोर महामार्गावर कापूरहोळ परिसरात पुलाखाली अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही नागरिकांना पुलाखाली एक युवक संशयास्पद अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.
Advertisement
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अचानक मृतदेह आढळल्याने भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा अपघाती मृत्यू आहे की अन्य कोणत्या कारणामुळे युवकाचा मृत्यू झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
Advertisement




