क्राईम

गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून ! आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक !! माळेगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी


अजित कोंढरे,
प्रतिनिधी.

बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसी परिसरात ३० वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा माळेगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडा करत गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे) याला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव वैशाली तानाजी पवार (वय ३०) असे असून, त्यांच्या सासू रंजना लक्ष्मण पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी शेजाऱ्यांनी वैशाली यांच्या पतीबाबत माहिती दिल्यानंतर रंजना पवार घरी गेल्या असता वैशाली या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

Advertisement

घटनास्थळाची पाहणी व परिसरातील चौकशीनंतर पोलिसांनी गणेश माने याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात आरोपीने महिलेवर हातोड्याने हल्ला करून अत्याचार केला व नंतर टॉवेलने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे.

शवविच्छेदन अहवालात डोक्यावर, मानेवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळल्या असून मृत महिला गर्भवती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आरोपीकडून हातोडा, कपडे व चोरीचे दागिने जप्त करण्यात आले असून न्यायालयाने त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!