महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांची विक्रम गायकवाड कुटुंबीयांची भेट
भोर : भोर तालुक्यातील उत्रोली गावामधील विक्रम गायकवाड या बौद्ध तरुणाची 8 फेब्रुवारी 2025 रोजी निघृणपणे हत्या करण्यात आली होती, त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती- जमाती अध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी आज उत्रौली तालुका भोर, जिल्हा पुणे येथील विक्रम (भैया) गायकवाड या दलित तरुणाच्या झालेल्या हत्तेच्या कारणास्तव पीडित कुटुंबीयांची भेट घेतली,भोरमधील शासकीय अधिकारी तसेच पोलीस प्रशासन यांच्याशी झालेल्या प्रकरणाबाबत त्यांच्या सर्व टीमने चर्चा केली
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष म्हणाले की, अनुसचित जाती-जमाती समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने या समाजाच्या सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय वगैर सद्यस्थितीचा अभ्यास करुन त्यानुषंगाने शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आहे. अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, यासाठी शासकीय यंत्रणांनी तक्रारदारांची तक्रार समजून घ्यावी, त्यावर सकारात्मकरित्या तोडगा काढावा. न्यायप्रविष्ठ तक्रारीसंदर्भात न्यायालयाचे आदेशाचे अवलोकन करुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
आयोगाला प्राप्त प्रकरणांवर संबंधित विभागाकडून केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी आढावा घेतला तसेच सविस्तर अहवाल आयोगाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सेवा विषयक प्रकरणांच्या संदर्भात शासन निर्णयांचा अभ्यास करुन तक्रारदाराला कशा पध्दतीने न्याय मिळवून देता येईल, यासाठी सकारात्मक विचार करण्यात यावा, तसेच केलेल्या कार्यवाहीचा कार्यपूर्ती अहवाल आयोगाला सादर करावा, असे निर्देश अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी दिले.




