क्राईम

पुरंदरच्या पांगारे गावात भररस्त्यात ४७ वर्षीय महिलेची निघृण हत्या ! धारदार शस्त्राने डोक्यावर वार


सासवड : पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे गुरुवारी (दि. १९) सकाळी साडेआठच्या सुमारास ४७ वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. उज्वला रामदास काकडे (वय ४७) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे पांगारे गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उज्वला काकडे या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. बसस्थानकाकडे जात असताना रस्त्यातच अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळच्या वेळेत भररस्त्यात घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

घटनेची माहिती पांगारे गावचे पोलीस पाटील तानाजी काकडे यांनी तातडीने सासवड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सासवड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण काय, तसेच हल्लेखोर कोण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. सासवड पोलीस अधिक तपास करीत असून, आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!