क्राईम

वेळू गावामध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ ! घरा समोरील स्प्लेंडर लंपास


खेडशिवापूर : भोर तालुक्यातील वेळू गावात घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील राजेंद्र पेटकर (वय २२, रा. वळू, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १२.४५ ते सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान वेळू गावातील त्यांच्या घरासमोर पार्क केलेली स्प्लेंडर कंपनीची बीएस-६ मॉडेलची काळ्या रंगाची मोटारसायकल (क्र. एमएच १२ डब्ल्यूवाय ६३२३) अज्ञात व्यक्तीने चोरी करून नेली.

Advertisement

चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असून वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वाहन मालकाने परिसरात शोध घेतला असता दुचाकीचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यानंतर त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस शिपाई नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!