क्राईम

भोर-शिरवळ मार्गावर संशयास्पद मृत्यू ! राजेवाडी हद्दीत तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ !! खून की अपघात याचा शोध सुरू


भोर : भोर–शिरवळ मार्गावरील राजेवाडी गावाजवळ एका तरुण महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या वळणाशेजारी असलेल्या झाडाझुडपात हा मृतदेह आढळल्याने घटनेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव–राजेवाडी हद्दीतील रस्त्याच्या वळणाजवळ स्थानिक नागरिकांना संशयास्पद स्थितीत महिलेचा मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती तत्काळ शिरवळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा तसेच अन्य आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली.

Advertisement

प्राथमिक तपासात संबंधित महिलेचा खून करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा प्रकार अपघाती मृत्यूचा आहे की खुनाचा, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!