क्राईम

स्वारगेट एसटी स्टँडमध्ये शिवशाही बसमधुन प्रवास करणाऱ्या तरुणीवर बलात्कार


पुणे :  बुधवार 26 फेब्रुवारी 2025 पीडित तरुणी गावाला निघालेली होती, आरोपीने तरुणीला धमकावून शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याआसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे 5 : 30 वाजता ही घटना घडली. पोलिसांना आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून त्याचा शोध पोलिसांनी तयार केलेली 8 पथके घेत आहेत.

Advertisement

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी वय 26 वर्ष ही फलटणला जाण्यासाठी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली होती, त्यावेळी तरूणी ज्या प्लॅटफॉर्म थांबली होती त्या ठिकाणी आरोपी आला व विचारू लागला कुठे जायचे तुम्हाला त्यावेळेस तरुणीने सांगितले फलटण ला जायचे आहे आरोपीने तरुणी सांगितले गाडी या प्लॅटफॉर्मवर लागत नसून पलीकडे लागते अन मला मी 10 वर्ष पुण्यामध्ये राहतो मला माहिती आहे, फलटणला जाणारी बस पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर लागत आहे आणि तुम्ही चुकीच्या प्लॅटफॉर्मवर थांबलेला आहात, तुम्ही पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जावा बस तेथे लागलेली आहे, सदर तरुणीला त्याने शिवशाही बसपर्यंत आणले व बस मध्ये चढण्यास सांगितले याचं बसमध्ये थोड्या वेळाने बसण्यास जागा देखील मिळणार नाही तुम्ही बस मध्ये बसून घ्या असे सांगितले, तरुणीने आरोग्यावर विश्वास ठेवून शिवशाही बसचा दरवाजा उघडून आत मध्ये प्रवेश करताच आरोपीने पाठीमागून येऊन लगेच दरवाजा लावून घेतला व तोंड दाबून, धमकवत तिच्यावर बलात्कार केला.

सदर आरोपी हा रेकॉर्डवर गुन्हेगार असून त्याचे नाव दत्तात्रय रामदास गाडे (वय वर्ष 35 राहणार मुळगाव शिक्रापूर) आहे. याच्या विरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तो जामीनावर बाहेर आलेला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!