वृक्ष वल्ली आम्हां सोयरे ! जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेनिमित्त माहेर संस्थे मार्फत शिरूर पंचक्रोशीत वृक्षारोपण मोहीम
श्री.वैभव पवार
संपादक.
शिरूर : वढू बुद्रुक मंगळवार दि. 10.06.2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक आणि पंचक्रोशीत वृक्षारोपण करण्याचा ध्यास सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माहेर संस्थे ने यंदाही मोहिमेस सुरुवात केली आहे.कोरेगाव भिमा येथील 05 महिला स्वयंसाहाय्यता बचत गटानामध्ये जागतिक पर्यावरण दिन व वट पौर्णिमा निमित्त महिलांना वृक्षरोपणासाठी रोपं देण्यात आली, वदू बुद्रुक येथेंही वृक्षाचे रोपण करण्यात आले.यासाठी वेकफिल्डचे एच आर श्री. योगेश सातव व श्री. महेश जोशी यांनी मोलाचे सहकार्य केले.वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षा पासून माहेर संस्था पर्यायावरण रक्षणा साठी कटीबद्ध आहे, यासोबत प्लस्टिक मुक्ती साठी कापडी पिशवी वितरण व तयार करण्याचे प्रशिक्षण ही देत आहे तर वदू बुद्रुक येथील संस्थेचा परिसर Plastic free zone असल्याचे संस्थेच्या संस्थापिका सि. लुसी कुरियन यांनी अगोदरच जाहीर केले आहे . याप्रकारचे अनेक उपक्रम संस्था सातत्याने राबवित आहे.शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे जतन अत्यावश्यक असून प्लास्टिकमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्लास्टिकच्या ऐवजी स्टील बाटल्या व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन संस्थेच्या स्वावलंबन (बचत गट प्रकल्प )व ट्रेनिंग प्रकल्प समन्व्यक सौ तेजस्विनी पवार यांनी केले. यासाठी पुढाकार घेऊन पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत, असेही त्या म्हणाल्या.
कुठलीही आकडेवारी न जाहीर करता शक्य तेवढी वृक्षलागवडी करण्याचा संकल्प माहेर संस्थेने केल्याचे जाहीर केले व प्रत्येकाने किमान 1तरि झाड लावण्याचे आवाहन केले व वृक्षांची वाढदिवसाप्रमाणे देखभाल केली जावी यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पनाही त्यांनी मांडली.
कोरेगाव भिमा, वदू बुद्रुक, आपटी, वाजेवाडी,पेरणे फाटा, शिक्रापूर,केंदूर,चौफुला,ई ठिकाणी जिथे माहेर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली महिला, युवक युवती, मिश्र बचत गट कार्यरत आहेत याठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचेही जाहीर केले.सदर कार्यक्रमासाठी माहेर संस्थेतील विद्यार्थी, एकनाथ तांबे, श्री. प्रकाश कोठावळे यांनी विशेष सहकार्य केले व महिलांना वट पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन व तेजस्विनी पवार यांनी आभार मानून
कार्यक्रम संपन्न झाला….




