भोर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ४ गट तर ८ गण निश्चित ! नवीन गट रचनेत भोर तालुक्यात एका गटाची वाढ
पुणे : महाराष्ट्र सरकारने पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे यापूर्वी २०२२ मध्ये निश्चित केलेली गट रचना आणि गण रचना अंतिम केली असून त्यासंदर्भातील अध्यादेश जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाने २०११ च्या जनगनणेनुसार ही आकडेवारी शासनाकडे सादर केली होती. राज्य शासनाने जिल्हा परिषद गट आणि गण यांची संख्या २०१७ च्या निवडणुकी प्रमाणे म्हणजेच पाच वर्षांचा कार्यकाळ संपला त्यावेळचा २०२२ च्या वेळी जी संख्या होती तीच गटांची संख्या कायम ठेवली आहे.
पुणे महापालिके मध्ये हवेली व मुळशीतील २३ गावे समाविष्ट झाली असल्याने हवेली तालुक्यातील गटांची संख्या सातने कमी झाली असून लोकसंख्येची सरासरी लक्षात घेऊन तालुकानिहाय गट-गण रचना पुन्हा करण्यात आली असून, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली होती, २०२५ च्या नवीन गट रचनेत भोर, जुन्नर, खेड, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटाची वाढ झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील गट-गण पुढीलप्रमाणे…
! तालुका ! ! गट ! ! गण !
१) जुन्नर. ८. १६
२) खेड. ८ १६
३) इंदापूर. ८ १६
४) शिरूर ७ १४
५) दौंड ७ १४
६) बारामती ६ १२
७) हवेली ६ १२
८) आंबेगाव ५ १०
९) मावळ. ५ १०
१०) भोर ४ ८
११) पुरंदर. ४ ८
१२) मुळशी ३ ६
१३) राजगड २ ४
अडीच ते तीन वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवट हटवल्यानंतर अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले आहेत. पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने तालुक्यातील सर्वच पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्यास तयार असलेल्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याने इच्छुकांकडून स्वतःची दावेदारी भक्कम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.




