क्राईम

वरंधा घाटातील वाहतूक विस्कळीत ! दोन ठिकाणी भूस्खलन !! अतिवृष्टीचा फटका !!! प्रवाशांची गैरसोय


भोर : भोर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका वरंधा घाटाला बसला असून शुक्रवार (दि. ३) रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घाटातील वारवंड व शिरगाव हद्दीत दोन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला संथ गतीने हजेरी लावली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून भोर तालुक्यात सर्वदूर संततधार व मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे डोंगरकड्यांमधील माती सैल होऊन वरंधा घाटात भूस्खलनाची घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Advertisement

दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाला याबाबत कळविले. माहिती मिळाल्यानंतर प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यंत्रणेसह घटनास्थळी रवाना होऊन रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

दरम्यान, घाटमार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!