राजकीय

भोर विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत ; 9 उमेदवारांची माघार


भोर : दि. 4 नोव्हेंबर 2024 (सोमवार) 203 भोर विधानसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 15 उमेदवारांच्या पैकी 9 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे

भोर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी 31अर्ज भरले होते. अर्जाच्या कागद पत्राची छाननीमध्ये कमी- जादा प्रमाणात त्रुटी आढळल्याने 16 उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते. यादरम्यान 15 उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरविण्यात आले होते. या 15 उमेदवारांपैकी 9 उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने 6 उमेदवारात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

1) संग्राम अनंतराव थोपटे, (काँग्रेस) चिन्ह हाताचा पंजा 2) शंकर हिरामण मांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी AP) चिन्ह घड्याळ 3) कुलदीप सुदाम कोंडे (अपक्ष) चिन्ह रिक्षा 4) किरण दत्तात्रय दगडे (अपक्ष) चिन्ह चहाची किटली 5) अनिल संभाजी जगताप (सैनिक समाज पार्टी) पक्ष चिन्ह 6) लक्ष्मण राम कुंभार (दलित शोषीत बिछडा वर्ग अधिकारी दल) पक्ष चिन्ह असे एकुण 6 उमेदवार रिंगणात असणार आहेत.

Advertisement

1) पियुशा किरण दगडे, 2) प्रमोद पंडित बलकवडे, 3) बाळासाहेब रामदास चांदेरे, 4) भाऊ पांडुरंग मरगळे, 5) राहुल चांगदेव पवार, 6) सचिन सदाशिव देशमुख, 7) समीर विठ्ठल पायगुडे, 8) सूर्यकांत राजाराम माने, 9) संजय भाऊसाहेब भेलके, या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेतली आहे.

ज्या उमेदवारांनी आता निवडणुकीतून माघार घेतली नाही, तरी ही त्यांचा पुढचा मार्ग सोपा नसेल. पक्षाची कोणतीही यंत्रणा या उमेदवारांचा प्रचार करणार नाही. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

एकूण परिस्थिती पाहता चौरंगी लढत होणार आहे,भोर विधानसभा मतदार संघांमध्ये जरी 6 उमेदवार असले तरी मुख्य लढत 4 उमेदवारा मध्येच होईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे मत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!