राजकीय

आमदार संग्राम थोपटे यांची पत्रकार परिषद निव्वळ राजकीय स्टंट : रणजित शिवतरे


भोर : 6 तारखेला झालेल्या प्रसंगा करीता जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई कराच परंतु ज्या कोणी कायदा हातात घेतला होता, गाड्या फोडल्या त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे.

आमदार बोलतात गाडी मध्ये मतदारांना वाटण्याकरीता पैसे आणले होते, प्रत्यक्षात पोलिसांनी त्या लोकांना चेक असता,त्याच्या गाडीतून फक्त 1160 रुपये भेटले, आमदाराच्याच कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये पैसे टाकले व व्हिडिओ काढला, व खोट्या केस करण्याकरितां पोलीस प्रशासनावर दबाव टाकला, दुसऱ्या दुसऱ्या दिवशी मतदान असल्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी असा स्टंट करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो,

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या दुकानातून बाहेर घेऊन मारहाण  केली त्याच्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे,, आमदाराच्या जवळच्या कार्य करण्याचे मटका, पत्त्याचे क्लब, गावठी दारू विक्री करणे असे अवैध धंदे असून ते सुरळीत चालावे म्हणून पोलीस प्रशासनावर हा एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे.

Advertisement

भोर नगरपालिका गेले पंधरा वर्षे त्यांच्याच ताब्यात असून त्यांच्या कडून भोर शहराचा म्हणावा असा विकास झाला नाही, शहरात अनाधिकृत बांधकाम,अवैद्य धंदे हे त्यांच्याच जवळच्या लोकांचे राजरोस चालु असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आमची तर अशी मागणी आहे भोर शहरातीलच नव्हे संपुर्ण भोर तालुक्यातील अवैद्य धंदेच बंद करावेत कारण हे धंदे त्यांच्याच बगलबच्चांचे आहेत गेले वीस वर्षापासून भोर नगरपालिकेतील दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदान घटत आहे, वास्तविक पाहता नगरपालिका म्हटलं की दर वेळी मतदाना मध्ये वाढ होत असते, परंतु दरवेळी येथील मतदार कमी होत असल्याचे दिसून येत आहे, कारण आहे उद्योग कंपनी यांची कमी असल्याने येथील स्थानिकाना पोट भरण्यासाठी बाहेर मुंबई-पुण्याला स्थलांतरीत व्होवे लागत आहे,याबाबत आमदार काहीही करताना दिसत नाहीत.

ज्या खोट्या केसेस करता ते पोलीस प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देत आहेत, त्या खोट्या केस करिता आम्ही स्वतःदिनांक 27/ 5/ 2024 ला एस पी ऑफीस मध्ये तक्रारी अर्ज दाखल केले असून या खोट्या केसेसची उचस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.

पत्रकार बंधूंच्या मार्फत पोलीस प्रशासनाला विनंती करत आहोत, की आमच्या पैकी कोणाची बाजू न घेता सर्व प्रकरणाचा पारदर्शक तपास करून जो कोणी दोषी असेल तो राष्ट्रवादीचा असो वा अन्य कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी नम्र विनंती.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!