कामथडी-भोंगवली गटामध्ये विकास आणि संघटनशक्तीच्या जोरावर उमेदवारीचा दावा : दशरथ जाधव आघाडीवर
कापूरहोळ : भोर तालुक्यातील कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद गटातून शिवसेना तालुका प्रमुख दशरथ जाधव यांनी सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आणि वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात मोठे कार्य करून तालुक्याच्या विकासाचा पाया बळकट केला आहे. लोकहिताचा आणि विकासप्रधान दृष्टिकोन ठेवत त्यांनी विविध योजनांद्वारे निधी मिळवून अनेक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.
1) कोळवडी स्मशानभूमीसाठी दहा लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मिळवून त्यांनी ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता केली.
2) कासुर्डी-गुंजन मावळ येथे दहा लाख रुपयांचा सिमेंट काँक्रीट रस्ता उभारणीचा प्रकल्प हाती घेऊन ग्रामीण भागातील वाहतुकीत सुलभता आणली.
3) कुलदीप कोंडे यांच्या माध्यमातून ओपन जिमसाठी दोन लाख रुपयांचा निधी मिळवून ग्रामस्थांच्या आरोग्यविषयक जाणीवेत वाढ केली आहे.
4) हिवाळी दिवसांची चाहूल लागताच गोरगरिबांना ब्लॅंकेट व चादरांचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली.
5) अंध मुलांसाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत त्यांनी या विशेष मुलांना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ उपलब्ध केले.
6) कोरोना काळात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘कोरोना योद्धा सन्मान’ प्रदान करून त्यांच्या सेवेला योग्य आदर अर्पण केला.
7) विविध शाळांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
8) जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि तायक्वांदो प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.
9) लव्हेरी गावातील शेतकऱ्यांना केशर आंब्याची रोपे वाटप करून फलोत्पादन संधी उपलब्ध करून दिल्या.
10) पुणे जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या माध्यमातून दोन वेळा जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करून युवा वर्गाला फिटनेसकडे वळवले.
11) बेरोजगार युवकांसाठी प्रसिद्ध कंपन्यांच्या सहकार्याने नोकरीमेळाव्याचे आयोजन करून रोजगार संधी निर्माण केल्या.
12) भारती हॉस्पिटल ब्लड बँकेच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिर घेत मानवी जीवन वाचवण्याच्या कार्याला चालना दिली जाते.
13) स्वर्गीय दादा कोंडके चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळी सण आदिवासी मुलांसोबत साजरा करून सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश दिला जातो.
दशरथ जाधव यांच्या कार्याचा मुख्य गाभा म्हणजे सर्वांगीण विकास त्यांनी घेतलेल्या उपक्रमांतून ग्रामविकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगतीला चालना मिळाली आहे.
भविष्यातील प्रमुख उद्दिष्ट्यांमध्ये क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय, उद्योग, सामाजिक व राष्ट्रप्रेम या पाचही अंगांचा समावेश आहे. विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन, विजेत्यांना चषक व बक्षिसे, योग आणि प्राणायाम वर्ग यासारख्या योजना राबवून जाधव यांनी युवकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर भर देण्याचा संकल्प केला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात ट्रस्टमार्फत लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गरजूंना मदत कार्यक्रम राबवले जातील. वैद्यकीय क्षेत्रात गरीब रुग्णांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करून “आरोग्य हेच धन” या संकल्पनेला चालना दिली जाणार आहे. उद्योग विषयक उपक्रमांतून तरुणांना खादी ग्रामोद्योग, शिवणकाम, हस्तकला, संगणक, टायपिंग यांसारख्या व्यवसायांद्वारे स्वावलंबी बनविण्याचे मार्गदर्शन केले जाईल.
राष्ट्रउत्सव, महापुरुषांच्या जयंती उत्सवांतून देशभक्तीचा संस्कार जोपासला जाईल. समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध जनजागृती करत व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन यासारखे आंदोलनात्मक उपक्रम राबवले जातील.
तसेच स्व. दादा कोंडके यांचे भव्य स्मारक उभारण्याचे आणि ऐतिहासिक स्थळांची दुरुस्ती करण्याचे त्यांनी उद्दिष्ट ठेवले आहे.
पुरस्थितीत नागरिकांना मदत करणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे व सामाजिक ऐक्य वाढवणे या उपक्रमांद्वारे दशरथ जाधव यांच्या रूपाने एक लोकाभिमुख, संवेदनशील आणि प्रगतीशील तरुण नेतृत्व म्हणून पुढे आले आहे.


