पुणे जिल्हा परिषद अध्यक्षाचा मान भोर तालुक्याला मिळणार ?
भोर : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रणजित शिवतरे यांच्या रूपाने भोर तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यानंतर काल सोमवार १३ ऑक्टोंबरला जिल्हा परिषद आरक्षण सोडत झाली भोर तालुक्यातील उत्रोली-कारी गट पुन्हा सर्वसाधारण आरक्षित झाल्यामुळे रणजित शिवतरे यांना संधी मिळाली आहे, त्यामुळे भोर तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणार का अशी चर्चा रंगत आहे.
रणजित शिवतरे यांचा कार्यकर्ते व सर्वसामान्यांसोबत तसेच विकास कामांबरोबरच जनतेशी असलेला दांडगा जनसंपर्कच निवडणुकीत त्यांची जमेची बाजू ठरत आहे. तळागाळातील कार्यकर्ते आणि उत्रोली-कारी गणातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात असतात. त्यामुळे निवडणुकीत मते आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो, त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार असल्याने त्यांना त्याचा काही ही फरक पडत नाही, ते या गणातून सहज विजयी होतील असे जाणकारांचे मत आहे.
भोर तालुक्यात गेल्या ४० वर्षांपासून आमदारकी थोपटे घराण्याच्या ताब्यात होती, राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार काशिनाथराव खुटवड यांच्यानंतर भोर विधानसभेच्या निवडणुकीत २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर विजयी झाले. त्यामुळे भोर तालुक्याला झुकते माफ मिळेल, अशी फलदायी आशा कार्यकर्ते बाळगून आहेत.
भोर विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असणारे रणजीत शिवतरे विधानसभेसाठी इच्छुक होते, परंतु अजित पवार यांनी त्यांना या वेळेस थांबण्याचा सल्ला दिल्याने ते पक्षाआदेश म्हणून थांबले, व राष्ट्रवादीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना निवडून आणण्याकरिता महत्वाची भूमिका बजावली.या अगोदरही त्यांना इतर पक्षांकडून विधानसभेकरिता संधी आल्या तरीही त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषवताना जिल्ह्यातील १३ तालुक्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम त्यांनी केले, पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षातील सर्व नेते मंडळीशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक निष्ठावंत व जुना नेता म्हणून रणजित शिवतरे यांची ओळख असुन त्यांना प्रशासनाचा देखील दांडगा अनुभव असल्यानेच ते प्रबळ दावेदार आहेत असे बोललं जात आहे. म्हणुन त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकारण पाहता शिवतरे यांना संधी देत निष्ठावंतांची या पक्षात कदर होते, असा संदेश देखील राष्ट्रवादी कडून दिला जाऊ शकतो.
दिवंगत सहकार महर्षी माधवराव टापरे यांच्या नंतर जवळ-जवळ ३० वर्षानंतर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भोर तालुक्याला मिळू शकते.




