राजकीय

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार


मनोज जरांगे पाटलांची विधानसभा निवडणूकितून माघार, मराठा बांधवांनी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या, एका जातीवर निवडून येणे अशक्य असल्याने तसेच दलित व मुस्लिम मित्र पक्षांची उमेदवार यादी वेळेत न आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले.

विधानसभा निवडणूकीला उभे राहण्याची केली होती घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे मत घेत निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते, जरांगे पाटील म्हणाले होते की, तुम्ही अर्ज भरा. 4 नोव्हेंबर  तारखेला सांगू कोणाचा अर्ज मागे घ्यायचा. जिथे आपल्या विचारांचा उमेदवार असेल त्यांना पाठिंबा द्यायचा. समीकरण जुळलं नाही तर निवडणुकीतून माघार घ्यायची. मी सांगेन तेव्हा त्या मतदारसंघातून अर्ज मागे घ्यायचा.

Advertisement

माझ्यावर महायुती महाविकास आघाडी तुन कुठलाही प्रकारचा दबाव नाही, ही माघार नसून गनिमी कावा आहे, 6 कोटी समाजाचची मान खाली जाऊ नये याकरिता असे धाडसी निर्णय घ्यावे लागतात, एका जातीवर निवडून येणे शक्य नाही, विधानसभा मतदारसंघ ठरले होते, फक्त उमेदवार घोषित करायचे बाकी होते.

105 वाल्यांना 2 जणांचा पाठिंबा घ्यावा लागतोय, असा टोला भाजपाला लावला, राजकारणामध्ये आम्ही नवखे असून पुढे अनुभव येऊ येईल, आम्ही कुठल्याही राजकीय व अपक्षला पाठिंबा दिलेला नाही, मी कुणालाही पाडा किंवा निवडून आणा असे म्हणत नाही, कोणाकडे जात नाही समाजाला जे करायचे ते करा, आपल्या समाजाला ज्यांनी अडचण निर्माण केली त्यांचे काय करायचे ते आपणच ठरुयात,आपले आंदोलन हे चालूच राहील.

मराठा समाजाने आपल्या आरक्षणाच्या बाजूने जो कोणी उमेदवार असेल त्यालाच मतदान करायचे असे आव्हान मराठा समाजाला मनोज जरांगे पाटलांनी केले आहे.

 

 

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!