ताज्या घडामोडी

बोरवळे गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात ! इतिहास, विचार आणि समाज प्रबोधनाचा संगम


वेल्हे : राजगड तालुक्यातील मौजे बोरवळे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य व प्रेरणादायी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. इतिहास, समाजप्रबोधन आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि दूरदर्शी कार्याचा गौरव करण्यात आला. काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, विविध तीर्थक्षेत्रांचा विकास, व्यापारी मार्गांची उभारणी तसेच शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजनांचा उल्लेख करून वक्त्यांनी त्यांच्या आदर्श प्रशासनाची माहिती दिली. न्याय, धर्म आणि सुशासन यांचे प्रतीक म्हणून अहिल्यादेवींचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून बोरवळे येथे हा जयंती उत्सव सातत्याने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने साजरा करणारे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम केवळ जयंती उत्सव न राहता इतिहास जागविणारी आणि समाजात सकारात्मक विचार रुजविणारी चळवळ बनल्याचे मान्यवरांनी सांगितले.

यावेळी विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक सलोखा, एकता आणि परस्पर आदराची परंपरा जपली. अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!