ताज्या घडामोडी

निवडणूक दरम्यान तीन दिवस ‘ड्राय डे’ घोषणा ! संपुर्ण मद्य विक्री बंद


मुंबई – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १ ते ३ डिसेंबर या तीन दिवसांसाठी सर्व प्रकारची मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशी-विदेशी मद्याची किरकोळ दुकाने, वाईन शॉप्स, बार, रेस्टॉरंट आणि माडी विक्री अनुज्ञप्ती असलेली सर्व ठिकाणे या कालावधीत बंद राहणार आहेत.

Advertisement

हा निर्णय मतदारांच्या सुरक्षिततेसाठी, सुव्यवस्थेसाठी तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी घेण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणा कठोरपणे या आदेशांची अंमलबजावणी करतील. नागरिकांनी शासनाचे निर्बंध काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ‘ड्राय डे’ च्या उपाययोजनांनी निवडणूक शांततामय व सक्षम रीतीने पार पडण्यास मदत होईल, असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. निवडणूक असलेल्या जिल्ह्यांतील संबंधित क्षेत्रांपुरती ही बंदी लागू होईल.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!