ठाकरे गटाला खिंडार ! युवासेना पुणे जिल्हा प्रमुख आदित्य बोरगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश !! शेकडो समर्थकांसह शक्तिप्रदर्शन
भोर : आदित्य प्रकाश बोरगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात भव्य प्रवेश करत पुणे जिल्हा व भोर तालुक्याचा राजकीय रंगत बदलण्याचे संकेत दिले आहेत. जिल्हाप्रमुख युवा सेना पुणे असलेल्या आदित्य बोरगे यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि समर्थकांनी भाजपात प्रवेश करून पक्षाच्या स्थानिक युतीला अधिक मजबूत केले आहे.
संभाजी यादव (सरपंच देगाव), विद्याताई यादव (मा.सरपंच देगाव), अजित बाबा चंदनशिव, तुळशीराम थिटे, अक्षय बोरगे यांसह अनेक मोठ्या नावांचा शिरकत असलेला हा प्रवेश शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा आव्हान ठरणार आहे, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
भाजपने या घडामोडींचा उत्साह व्यक्त करत आगामी भोर नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचा ठसा उमटेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.या प्रवेशामुळे भोर भागातील राजकीय वातावरण गंभीर आणि उत्कंठावर्धक बनल्याने पुढील काळात इथल्या राजकारणात मोठे बदल घडून येण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशातील प्रभुत्व अधिक मजबूत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




