ताज्या घडामोडी

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मनोज गायकवाड यांची बिनविरोध निवड ! महाराष्ट्र कारागृह पोलीस अधिकारी-कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मतदार प्रतिनिधी म्हणून संधी


पुणे : आगामी काळात होणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६-३१ पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कारागृह पोलीस अधिकारी-कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मनोज हनुमंत गायकवाड यांची संस्थेच्या वतीने मतदार प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संस्थेच्या सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संचालक मंडळातील पदाधिकारी, सदस्य व सभासदांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी मनोज गायकवाड यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधी म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

सभेला व्हाईस चेअरमन अतुल पटेकर, सचिव भरत बंडगर, सहसचिव योगेश पाटील, तज्ज्ञ संचालक उमेश देशमुख तसेच संचालक प्रमोद जाणगाव, प्रमोद इंगळे, साहेबराव वालुंजुले, दौलत खिलारे, गजानन शिंदे, संचालिका प्रणाली कोकाटे, लीला धुमाळ व अर्चना सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. गायकवाड यांच्या निवडीमुळे संस्थेचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!