ताज्या घडामोडी

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भोर तालुका शिवसेनेचे (उ.बा.ठा.) तहसीलदारांना निवेदन


भोर : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पुणे युवा जिल्हा प्रमुख अदित्य बोरगे, जिल्हा संघटक माऊली शिंदे, तालुका प्रमुख दशरथ गोळे ,तालुका प्रमुख भरत नाना साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने अद्याप पंचनामे व मदतीबाबत ठोस निर्णय घेतला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर तयार असलेल्या शेततळी, वीज पुरवठा व्यवस्था, पंपसेट व वाहतूक व्यवस्था यांचेही मोठे नुकसान झाल्याचेही यामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने तातडीने विशेष निधी मंजूर करून पीकविमा हप्ता माफ करावा, तसेच नुकसानग्रस्तांना किमान हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Advertisement

पुणे जिल्हा संघटक माऊली शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांचा प्रलंबित पीकविमा, शेतीमालाचे भाव आणि नुकसान भरपाई यासंदर्भात सरकारचे  धोरण अत्यंत संथ गतीने चालु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नाही. या परिस्थितीकडे सरकारने गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा.

पुणे जिल्हा युवासेना प्रमुख आदित्य बोरगे म्हणाले की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सतत पाठपुरावा करत राहील.

यावेळी शिवसेना भोर तालुकाप्रमुख.दशरथ गोळे, भरतनाना साळुंखे, जिल्हा संघटक माऊली शिंदे, युवा जिल्हाप्रमुख आदित्य बोरगे, तालुका संघटक योगेश गाडे, संतोष पावगे, भोर प्रमुख चंदन कोळसकर, उपतालुकाप्रमुख निलेश मुजुमले, केशव साळेकर, वाटकर मामा, शरद खाटपे तसेच शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!