मनःपूर्वक धन्यवाद : सौ.मोनिका दशरथ जाधव उमेदवार शिवसेना (UBT) ; कामथडी पंचायत समिती गण
कापूरहोळ : ईश्वर सेवेकडून मानव सेवेकडे हे ब्रीद वाक्य घेऊन मी आजपर्यंत सामाजिक व राजकिय जीवनात सर्व सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानुन कार्यरत राहण्याचे उद्दिष्ठ ठेवले. मी कोणताही लोकप्रतिनिधी नसताना देखील पक्ष व ट्रस्टच्या माध्यमातुन तालुक्यातील विविध विकास कामे केली. भोर तालुक्यातील धरण क्षेत्रातील व डोंगरी दुर्गम भागातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत विकास कामाचा लाभ मिळावा यासाठी मी सर्वपरी प्रयत्न करणार आहे.
निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यावर उभी असताना मनात एकच भावना दाटून येते, ती म्हणजे कृतज्ञतेची! या संपूर्ण प्रचार प्रवासात प्रत्येक टप्प्यावर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, माता-भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!
प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीमध्ये नागरिकांनी केलेलं प्रेमळ स्वागत आणि मनापासून केलेला संवाद हा माझ्यासाठी मोठा आधार ठरला. तुमचा विश्वास, तुमची साथ आणि तुमची सकारात्मक भावना, यामुळेच प्रत्येक भेट अधिक अर्थपूर्ण झाली आणि हा प्रचार केवळ औपचारिक न राहता लोकांच्या मनाशी जोडला गेला.
ही लढाई फक्त निवडणूक जिंकण्यापुरती मर्यादित नाही, तर आपल्या परिसराच्या उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी आहे. काल प्रचाराची सांगता झाली असली तरी जनतेच्या मनात निर्माण झालेला ठाम विश्वास हेच सांगतो की विजय नक्कीच आपलाच आहे.
सौ.मोनिका दशरथ जाधव




