ताज्या घडामोडी

कापूरहोळमध्ये गटार व रस्त्याच्या कामासाठी ८ लाखांचा निधी मंजूर ! चंद्रकांत बाठे यांच्या प्रयत्नांना यश !! स्थानिक रहिवाशांकडून अभिनंदन व आभार


कापूरहोळ : भोर तालुक्यातील कापूरहोळ येथील नागरिकांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली गटार व रस्त्याची समस्या आता मार्गी लागणार आहे. सावित्रा रमेश पांगारे यांच्या घरापासून अभिलाष चंद्रकांत देवपरे यांच्या घरापर्यंत गटार व रस्ता बांधकामासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून आठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग (उत्तर) यांच्याकडून १४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या विकासकामासाठी चंद्रकांत बाठे यांनी विशेष पुढाकार घेत जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, जिल्हा परिषद निधीअंतर्गत सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातून या कामासाठी आठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गटार व रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होऊन स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

Advertisement

निधी मंजुरीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी चंद्रकांत बाठे यांचे अभिनंदन करून आभार मानले. विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी मनीषा मोकाशी, सुजाता राजपुरे, सावित्रा पांगारे, आनंद दळवी, नारायण भिलारे, गिरीश पवार, लहू खवले, सुनील थापा, किरण येवले, ईश्वर परदेशी, प्रशांत धुमाळ, योगेश इंगवले, संकेत गुरव,गोसावी दाम्पत्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रकांत बाठे यांचे मनोगत :

कापूरहोळमधील नागरिकांची गटार व रस्त्याची समस्या मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचा मनस्वी आनंद आहे. विकासकामे ही जनतेच्या सोयीसाठी असतात. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहणार आहे. या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!