ताज्या घडामोडी

पांगारेतील शिक्षिकेच्या खुनाचा सासवड पोलिसांकडून अवघ्या सात तासांत उलगडा ! दीरच निघाला मारेकरी !! पैसे, चेक, सोन्याचे दागिने आणि कागदपत्रांच्या वादातून हत्या


सासवड : पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे कौटुंबिक वादातून ४७ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेचा सासवड पोलिसांनी अवघ्या सात तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मृत महिलेचा दीर शशिकांत काकडे याला शिरवळ येथून अटक करण्यात आली असून, सासूविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.

उज्ज्वला रामदास काकडे (वय ४७, रा. पांगारे, ता. पुरंदर) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि. १९) सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास पांगारे गावच्या हद्दीत ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत माणिकराव काकडे याने दाजी रामदास काकडे यांच्याकडून घेतलेले पैसे, चेक, सोन्याचे दागिने आणि कागदपत्रे परत मागण्यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हिंसक घटनेत झाले. शशिकांत याने उज्ज्वला यांच्या डोक्यात लोखंडी रॉड व विटेने वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या कृत्याला सुलोचना माणिकराव काकडे यांनी पाठबळ दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement

याप्रकरणी गणेश दत्तात्रय मेमाणे यांच्या फिर्यादीवरून सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ व ३(५) प्रमाणे शशिकांत व सुलोचना काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या सात तासांत तपासाचा छडा लावत मुख्य आरोपीला शिरवळमधून अटक केल्याने या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. या घटनेने पांगारे परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!