ताज्या घडामोडी

भोर-राजगड तालुक्यातील माय-बाप-जनतेचा भ्रमनिरास ! स्वयंघोषित श्रावण बाळाकडून जनतेला ठेंगा


 

कापूरहोळ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी फराळाचे साहित्य वाटप करणार असल्याचे आश्वासन देत भोर-राजगड तालुक्यांतील माय-बाप-जनतेचा विश्वास संपादन करून रांगा लावून जनता माझ्यासोबत असल्याचे दिशाभूल करून कामा पुरता मामा म्हणीप्रमाणे स्वयंघोषित श्रावण बाळाचा जनतेला ठेंगा.

आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या एका व्यक्तीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी दिवाळी फराळ साहित्य वाटप व काशीविश्वेश्वर दर्शन घडवून स्वतः ला स्वयंमघोषीत श्रावण बाळ म्हणून संबोधीत करून स्वतःच्या कामाचे स्वतः कौतुक करून जनतेची चक्क दिशाभुल केल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे.

दरवर्षी दिवाळीच्या फराळाचे साहित्य वाटप करण्याची घोषणा करूनही निवडणूकी आगोदर मोठ-मोठया बाता मारून गाजावाजा करून घेतला. या बाळाने दिलेले आश्वासन पाळले नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या गोड घोषणेमुळे गोरगरीब जनतेची थटा केली. त्यांच्या गरीबीचा चित्रीकरण करून मी जनते मनातील श्रावण बाळ असल्याचे बॕनर फ्लॕक्स लावून प्रसिद्धी मिळवली. हा खरा श्रावण बाळ असता तर जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी यंदा फराळ साहित्य वाटप असते. अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

Advertisement

बाळाने मागील वर्षांपासून प्रत्येक “कुटुंबाला फराळाचे साहित्य देऊ” असे आश्वासन देऊन लोकांचा विश्वास संपादन केला होता. मात्र प्रत्यक्षात आज लक्ष्मीपूजन-दिवाळी असुन कोणालाही फराळ साहित्याचा लाभ मिळाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे लोक विचारत आहेत की “स्वयंघोषित आधुनिक श्रावण बाळ” म्हणवणारे आता कुठे गेले ?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आकर्षित करण्यासाठीच हे आश्वासन दिले गेले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रचारादरम्यान “सर्वांसाठी दिवाळी फराळ” अशी घोषणा देत जनतेची मनधरणी करण्यात आली होती. मात्र आता ती केवळ घोषणांपुरतीच राहिली असून लोकांच्या विश्वासाला तडा गेला आहे.

लोकांच्या अपेक्षांची खिल्ली उडवत केवळ मतांसाठी दिलेली आश्वासने होती का, असा प्रश्न आता सर्व स्तरांतून विचारला जात आहे. भोर-राजगड मधील माय-बाप-जनता श्रावण बाळाकडे उत्तरांची मागणी करत आहेत, भर सभेत त्यांनी दिलेले वचन हे वचनच राहील अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा चालू आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!