ताज्या घडामोडी

प्रचाराचा ‘दिस’ मावळणार, पण विजयाचा ‘सूर्य’ चंद्रकांत बाठे यांच्या रूपाने उगवणार


कापूरहोळ : जिल्हा परिषद आणि भोर पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीचा आज अधिकृत शेवटचा दिवस आहे. बुधवारी रात्री १०वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

मात्र प्रचाराची सांगता होण्यापूर्वीच भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटांमध्ये राजकीय आखाड्यात माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे अपक्ष उमेदवार यांच्या पारडे स्पष्टपणे जड झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून चंद्रकांत बाठे व भोर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनिता चंद्रकांत बाठे यांच्या विकास कामाच्या झंझावाता समोर विरोधी गटाचा निभाव लागणे कठीण झाले आहे. या गटामध्ये ‘रिक्षा’ सुसाट सुटली असून मतदारांनी आधीच त्यांच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

चंद्रकांत बाठेचे पारडे जड का आहे ?
• प्रचाराच्या या शेवटच्या टप्प्यात विरोधकांकडे सांगण्यासारखे मुद्देच उरले नाहीत. दुसरीकडे, त्यांनी केलेल्या कामांची यादी मतदारांच्या मुखी आहे.

Advertisement

• जिल्हा परिषद गटातील युवक एकत्र आल्याने, तसेच भोर तालुक्यातील विविध गावांमधून युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने चंद्रकांत बाठे यांचे नेतृत्व स्वीकारल्याने त्यांची ताकद दुप्पट वाढली आहे.

•. विरोधकांची ‘केविलवाणी’ धडपड
विरोधी गटाकडून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला मतदारांनी साफ नाकारले आहे. “विकास हवा असेल चंद्रकांत बाठेच्या पाठीशी उभे राहा,” हा विचार आता घराघरात पोहोचला आहे.

आज रात्री १० वाजता प्रचार थांबेल, पुढचे काही तास शांततेचे असतील. पण ही शांतता चंद्रकांत बाठेच्या मोठ्या विजयाची नांदी आहे. विकासाचा फॉर्म्युला गटातील मतदारांनी डोक्यावर घेतला आहे. त्यामुळे, मतमोजणीची केवळ औपचारिकता बाकी असून निकाल त्यांच्या बाजूने लागणार, यावर आजच्या शेवटच्या दिवशी शिक्कामोर्तब झाले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!