ताज्या घडामोडी

जागतिक सायकल स्पर्धेची वारी भोरच्या दारी ! कापूरहोळ गावच्या नियोजन सभेत प्रशासनाचा मार्गदर्शनाचा धडाका


कापूरहोळ : दि. 1 जानेवारी (गुरुवार) भोर तालुक्यातील कापूरहोळ ग्रामपंचायत येथे ‘जागतिक स्पर्धेची वारी भोरच्या दारी’ या उपक्रमांतर्गत नियोजनासाठी आढावा सभा संपन्न झाली. यावेळी सभेत स्पर्धेच्या तयारी बाबत विविध मुद्द्यासह सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा व स्वयंसेवक नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामपंचायतीने उत्तम नियोजन केले होते.

जागतिक दर्जाची सायकल स्पर्धा मोठी अभिमानाची बाब असून, गावाचा व तालुक्याच्या परिसराचा नावलौकिक वाढेल व युवकांना क्रीडाक्षेत्रात प्रेरणा मिळेल, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासन, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी समन्वयाने काम करावे, असे भोरचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले.

Advertisement

उपसरपंच पंकज ऊर्फ रविंद्र गाडे म्हणाले, “या स्पर्धेमुळे कापूरहोळ व भोर तालुक्याची जागतिक ओळख होईल व ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण होईल.” ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून, स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले.

सायकल स्पर्धेच्या नियोजन आढावा सभेत मार्गदर्शन करण्यासाठी भोर प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे उपस्थित होते.

यावेळी कापूरहोळ गावच्या विद्यमान सरपंच मंगल गाडे, उपसरपंच पंकज ऊर्फ रविंद्र गाडे, ग्रामपंचायत सदस्य अजित शेख, रोहित जगताप, प्रज्ञा गाडे, वीर धाराऊ माता तरुण मंडळाचे कार्यकर्ते मस्कोबा गाडे, अशोक शिंदे, अभिजीत गाडे, सागर गाडे, सूर्यकांत राजवडे, स्वप्निल गाडे, रोहित गाडे, शशिकांत गाडे, सचिन खुटवड, रामदास गाडे, तलाठी भाऊसाहेब शिर्के, ग्रामविकास अधिकारी एस. एन. वाकळे, संगणक परिचालक धुमाळ, शाळा मुख्याध्यापिका सुजाता कुंभार व पर्यवेक्षक संदीप हिंगाने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!