ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात रस्त्यासाठी भागवत एकादशीला टाळ वाजवत आंदोलन ! संभाजी ब्रिगेडचा पंचायत समितीवर हल्लाबोल


नसरापूर : भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. ते गराडे खिंड हा नवीन रस्ता वनपरवानगी मिळूनही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दिरंगाईमुळे रखडला असल्याबाबत संभाजी ब्रिगेडने भागवत एकादशीच्या निमित्ताने पंचायत समिती कार्यालयासमोर टाळ वाजवत शांततामय आंदोलन केले. गावकऱ्यांसह अभंग म्हणत नाराजी व्यक्त केली.

कांबरे खे.बा. ते गराडे खिंड हा पूर्णपणे नवीन रस्ता असून, लागणारी जमीन वनविभागाच्या अखत्यारीत होती. अनेक वर्षांच्या पाठपुराव्याने वन विभागाची परवानगी मिळाली, तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीने आवश्यक प्रस्ताव दाखल न केल्याने काम रखडले आहे. संभाजी ब्रिगेड गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रशासकीय दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली.

Advertisement

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री सिद्धार्थ कोंढाळकर म्हणाले, “हा रस्ता पूर्ण झाल्यास भोर व पुरंदर तालुके जोडले जातील. नसरापूर व सासवड ही प्रमुख गावे जोडली गेल्याने दळणवळण सुलभ होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि स्थानिक व्यापाराला चालना मिळेल.”या आंदोलनाने प्रशासनावर दबाव वाढला असून, लवकर काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!