भोर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल ! भाजप-राष्ट्रवादी प्रत्येकी 2 जिल्हा परिषद व प्रत्येकी 4 पंचायत समितीच्या जागा
भोर : दि. ९ भोर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चुरशीच्या लढ्यात दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाले.
•जिल्हा परिषद विजेते•
1) वेळू-नसरापूर गट – पोपटराव सुके (भाजप)
2) कामथडी-भोंगवली गट -विक्रम खुटवड (राष्ट्रवादी)
3) भोलावडे-शिंद गट – प्रवीण जगदाळे (राष्ट्रवादी)
4) कारी- उत्रोली गट – स्वरूपा संग्राम थोपटे (भाजप)
• पंचायत समिती विजेते •
1) वेळू गण: भाजप – माऊली पांगारे
2) नसरापूर गण: राष्ट्रवादी – विशाल (बंटी) कोंडे
3) भोंगवली गण – रोहन बाठे (भाजप)
4) कामथडी गण – सौ.तृप्ती विक्रम खुटवड (राष्ट्रवादी)
5) भोलावडे गण – राजेश बोडके(राष्ट्रवादी)
6) शिंद गण – मनीषा कंक(राष्ट्रवादी)
7) कारी गण – गीता आनंदराव आंबवले(भाजप)
8) उत्रोली गण – सुषमा विक्रम चव्हाण (भाजप)
विकासाच्या मुद्द्यांवर लढलेल्या या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी ग्रामीण भागाचा विकास करण्याचे आश्वासन दिले.




