ताज्या घडामोडी

विक्रम गायकवाड यांच्या हत्येच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी भोरमध्ये जनआक्रोश मोर्चा ; सर्व आंबेडकरी पक्ष व संघटना सहभागी होणार


भोर :  भोर तालुक्यातील उत्रोली गावामधील विक्रम गायकवाड या बौद्ध तरुणाची 8 फेब्रुवारी 2025 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी समस्त आंबेडकरी समाजाकडून मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चामध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, आरपीआय सचिन खरात गट, दलित युथ पॅंथर, भीम आर्मी संघटना, रिपब्लिकन एकतावादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, NCP सामाजिक न्याय विभाग, आंबेडकरवादी विविध संघटना तसेच विक्रम गायकवाड यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत.

Advertisement

विक्रम गायकवाडने सप्टेंबर 2024 मध्ये कोर्ट मॅरेज आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणाला विरोध करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. संबंधित मुलीने विक्रमला त्याच्या शेतात भेट घेऊन त्याला सावध राहण्याचा सल्ला दिला होता. आपल्या लग्नाला माझ्या घरच्यांचा विरोध असुन ते तुला मारणार असल्याचे तिने त्याला सांगितले होते. आणि दोनच दिवसाने विक्रम गायकवाड मृत अवस्थेत सापडला होता.कुटुंब सांगत असलेल्या अँगलने तपास होत नसल्याचा आरोप पोलीस प्रशासनावर होत आहे.

या घटनेचा तात्काळ तपास सीआयडी, एसआयटीकडे देण्यात यावा, अशी मागणी समस्त आंबेडकरी राजकीय पक्ष व संघटनांनी केलेले आहे. राज्य सरकारने गांभीर्याने या प्रकरणात भूमिका घ्यावी. दलितांवर होणारे अन्याय रोखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेले असल्यानेच  माहिती सरकारच्या कार्यकाळात बिनधास्त अन्याय अत्याचार वाढत आहेत. असा आरोप समस्त आंबेडकरी जनता करत आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!