ताज्या घडामोडी

पीएमआरडीए कामकाज विकेंद्रीकरण करण्याच्या प्रस्तावास मंजुरी


 

पुणे : दि. 16 फेब्रुवारी 2025 (रविवार) रोजी PMRDA (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या) आर्थिक वर्षाच्या 2025-2026 अर्थसंकल्प संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली, या बैठकीत ‘पीएमआरडीए’ च्या कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता त्या प्रस्तावास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. PMRDA पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण यांनी कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 4 प्रादेशिक कार्यालय आणि हद्दीतील प्रत्येक तालुक्यांमध्ये 1 कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना कामकाजासाठी प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय आकुर्डी येथे जाण्याची आवश्यकता लागणार नाही.

‘पीएमआरडीए’चे 6 हजार 246 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र आहे. त्यामध्ये 9 तालुक्यातील 697 गावांचा समावेश आहे, त्यामुळे या गावांतील नागरिकांना कामासाठी पुणे शहरात यावे लागते. त्यासाठी लागणारा वेळ आणि होणारा खर्च विचारात घेतला तर नागरिकांना ते त्रासदायक असुन नागरीकांना सर्व सुविधा त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी मिळणे सोईचे व्हावे, यासाठी प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.प्रत्येक वेळी प्राधिकरणाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, हा त्यामागे उद्देश असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. त्यानुसार प्राधिकरणाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा 4 ही दिशांना प्रादेशिक कार्यालय आणि प्रत्येक तालुक्यात उपकार्यालय काढण्यात येणार आहे. या कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट प्राधिकरणाकडून ठेवण्यात आले आहे.

Advertisement

PMRDA च्या सुविधा पुढीप्रमाणे

1) बांधकाम परवानगी अर्ज स्वीकारण्याची सुविधा

2) झोन दाखले

3) अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवणे.

4) भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लागणे.

5) अग्निशमन यंत्रणा उभी करणे

6) घरकुल योजनेचे अर्ज स्वीकारणे.

7) तक्रार अर्जाचे दाखल करून घेणे.

8) विकास आराखड्याची अंमलबजावणी

40 ते 50 किलोमीटरचा प्रवास करून मुख्य कार्यालयात येण्याऐवजी नागरिकांची कामे तालुक्याच्या ठिकाणी मार्गी लागावीत, या उद्देशाने प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. तालुक्याच्या ठिकाणच्या कार्यालयातच तक्रारींचे निवारण व्हावे, बांधकाम परवानगीसाठी अर्ज करता यावा, यासारखे नागरिकांशी संबंधित सर्व खात्याचे अधिकारी तेथे उपस्थितीत राहणार आहेत. अशी माहिती डॉ. योगेश म्हसे. आयुक्त पीएमआरडीए यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!