पती-पत्नीमध्ये किरकोळ भांडण ! पत्नी व सासूसह जमावाची पतीस मारहाण
शिवापूर : हवेली तालुक्यातील रहाटवडे गावात २२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास भयानक मारहाण प्रकरण घडले. कुलदीप सुदाम विरामणे (वय वर्ष २७) रा. मोहरी बुद्रुक, ता. भोर, याला त्याच्या पत्नी वैश्णवी कुलदीप बीरामणे व सासू सारीका गणेश धुमाळसह सहा जणांच्या जमावाने लाठी-काठी, चाकू, कुदळ व दगडांनी मारहाण केली. यात कुलदीप व त्यांची बहीण साधना चोरघे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
राजगड पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. १२३/२०२६ अंतर्गत बीएनएस ३३३, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२)(३), १९० कलमांतर्गत FIR गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टे.डा.नं. ३९/२६ असलेली ही फिर्याद २३ मार्चला रात्री ९.०३ वाजता दाखल झाली.
फिर्यादीनुसार, रहाटवडे येथे बहिण साधना चोरघे यांच्या घरासमोर कुलदीप घरी असताना आरोपी वैश्णवी, सारीका (रा. कोंढवा, पुणे), स्वाती तावरे (रा. कोंढवा), सीमा रामभाऊ चोरघे (रा. रहाटवडे), रामभाऊ विश्णु सणस (रा. रहाटवडे), सागर शेजवळ यांनी बेकायदेशीर जमाव जमवला. तू पत्नीला मानसिक त्रास देतोस असा गैरसमज करून त्यांनी मारले.
कुलदीपला हाताने, चप्पलने मारहाण सुरू केली त्यावेळी बचावण्यासाठी आलेल्या साधनाला सागर व रामभाऊ यांनी मारले. नंतर सारीका व स्वाती यांनी कुलदीपला घराबाहेर ओढून चप्पलने मारले. रामभाऊने चाकूने पाठीमागून ओरखडले, तर सागरने दूधाचे किटली व लोखंडी कुदळीने डोक्यात मारहाण केली. निघताना शिवीगाळ, दमदाटी करत दगड उचलून हल्ला केला, ज्यात एक दगड कुलदीपच्या डोक्याला लागला असुन त्यामध्ये तो जखमी झाला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा अंमलदार तळपे, तपासी सफौ बरकाले हे करत आहेत.




