भोर तालुक्यातील निगुडघर येथे महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह दिन मोठया उत्सवात साजरा
भोर : भोर तालुक्यातील निगुडघर येथे महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह दिन गेल्या ११ वर्षांपासून साजरा होत असलेल्या परंपरेप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बौद्धजन संघ भोर तालुका यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पुरुष-महिला कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांच्या आपटी येथील स्तंभाला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. निगुडघर येथे बुद्धवंदना, जाहीर सभा, मान्यवरांचा सत्कार झाला. महाराष्ट्रभरातून महाड चवदार तळ्याकडे जाणाऱ्या भिम अनुयायांसाठी भोजन दान, पाणपोई व सरबतची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. बौद्धचार्य पोपटराव चव्हाण यांनी चळवळीतील गाण्यांनी मैफली रंगवली.
कार्यक्रमाला दि. खासदार बाळासाहेब साळुंखे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कश्यप साळुंके, बौद्धजन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सपकाळ, अविनाश गायकवाड, सरपंच मंगल कंक, अनिल गायकवाड, राजन घोडेस्वार, सुनिल मोरे, सचिन गायकवाड, प्रकाश गायकवाड, विजय गायकवाड, अंकुश साळुंखे, बबन गायकवाड, दीपक गायकवाड, गणेश साळुंखे, हनुमंत गायकवाड, गौतम सपकाळ, आनंदा सातपुते, सागर मळेकर, देवा म्हसूरकर, रविंद्र कांबळे, महेंद्र साळुंखे यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामजिक न्याय विभाग अध्यक्ष अविनाश गायकवाड, यांनी केले तर प्रास्ताविक भोर तालुका आंबेडकर चळवळीचे नेते अनिल गायकवाड, आणि कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्यांचे आभार बौद्ध महासंघाचे सदस्य विजय ओव्हाळ यांनी मानले.




