ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बिगुल वाजणार ! पुणे जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !! ४ मे ला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार 


पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा असलेल्या ७५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रशासनाने वेग घेतला आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तहसील पातळीवर जाहीर झाला असून, ४ मे रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार आहे. यादिवशी निवडणुकीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल.

राज्यात मुदत संपलेल्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी २० फेब्रुवारीपासून प्रभागरचनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रामसेवकांनी गावागावांत प्रत्यक्ष पाहणी करून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हद्दी निश्चित केल्या. १३ एप्रिलपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या. २१ एप्रिलपर्यंत सुनावण्या झाल्या असून, २८ एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे.

Advertisement

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

खेड : ९१

भोर : ७३

शिरूर : ७१

जुन्नर : ६८

पुरंदर : ६८

इंदापूर : ६१

दौंड : ५७

मावळ : ५७

बारामती : ५२

मुळशी : ४६

वेल्हे : ३१

आंबेगाव : २८

लोणी काळभोर : २७

हवेली : २४

प्रभागरचना पूर्ण झाली तरी आरक्षण सोडत, मतदार यादी अद्ययावत करणे व हरकती यांसारख्या प्रक्रिया बाकी आहेत. यासाठी दीड-दोन महिने लागतील.

मे-जूनमध्ये निवडणुका झाल्यास पावसाळा व खरीप हंगामामुळे शेतीकाम अडथळा ठरेल, असे प्रशासकीय सूत्र सांगतात. त्यामुळे मतदान पावसाळ्यानंतर लांबण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील गावपातळीवर राजकीय गणिते सुरू झाली आहेत. इच्छुक उमेदवार जनसंपर्क वाढवत आहेत. ४ मे नंतर प्रभागनिहाय आरक्षण स्पष्ट होईल, ज्यामुळे गटबाजी व रणनीतींना वेग येईल. ग्रामीण राजकारणाचा सोहळा सज्ज होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!