ताज्या घडामोडी

भोर एसटी डेपोची सेवा ढिसाळ ? सर्विस रोडवर न थांबल्याने प्रवाशांची गैरसोय


नसरापूर : भोर तालुक्यातील विविध गावांमध्ये एसटी सेवेबाबत गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. भोर एसटी डेपोच्या गाड्या ठराविक गावांच्या थांब्यावर सर्विस रोडने न येता थेट ओव्हरब्रिजने जात असल्याने प्रवाशांची अडचण वाढली आहे.

वरवे, शिवरे, वेळू, कोंढणपूर कामथडी आणि ससेवाडी या गावांतील नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या भागातील एसटी गाड्या काहीवेळा गावाच्या थांब्यावर न थांबता सरळ ओव्हरब्रिजने पुढे जाऊन प्रवाशांना लांब अंतर पायी चालावे लागते. याचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कामगार वर्गाला बसत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तर ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामांसाठी मोठी कसरत करावी लागतेय.

Advertisement

ज्येष्ठ नागरिक कोंडीबा शिंदे यांनी वारंवार तक्रारी केल्या असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून एसटी गाड्या सर्विस रोडने गावाच्या थांब्यावर थांबतील याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. स्थानिक नागरिकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांच्या सोयीसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!