ताज्या घडामोडी

मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते मौजे बारे खुर्दला समाजमंदिर व रस्त्याचे भव्य उद्घाटन


 

भोर : भोर राजगड मुळशीचे कार्यसम्राट मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते भोर तालुक्यातील मौजे बारे खुर्द येथे ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीप्रमाणे स्थानिक आमदार निधीतून समाजमंदिर बांधकाम (रक्कम ५ लाख रुपये) व विश्वनाथ गायकवाड घरापासून भोर-पसुरे रस्त्याचे रु.१५.१० लाख खर्चाने काम पूर्ण करून भव्य उद्घाटन करण्यात आले. एकूण २०.१० लाख रुपयांच्या या विकासकामामुळे गावकऱ्यांच्या सोयी सुविधा वाढल्या असून, स्थानिक पातळीवर विकासाला चालना मिळाली आहे.

Advertisement

या कार्यक्रमप्रसंगी भोर तालूका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल गोरे, खरेदी-विक्री संघाचे संचालक विजय शिरवले, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष अनंता दूरकर प्रमुख उपस्थित होते. तसेच माऊली दानवले, पंढरीनाथ राजीवडे, सरपंच सौ.सविता संदीप गायकवाड, उपसरपंच सौ.सारिका संतोष बदक, सदस्या सुमन बदक, मा.उपसरपंच सुरेश खुटवड, हनुमंत बदक, बारे बु.मा.सरपंच सागर दानवले, अनिल गायकवाड, लक्ष्मण खुटवड, दिलीप खुटवड, सुरेश खुटवड, सत्यवान तळेकर, समीर खुटवड, सागर बदक, दिलीप मांढरे, सचिन चंदनशिव आदींसह ग्रामस्थ, महिला व तरुणवर्ग मोठ्या संख्येने हजेरी लावली.

मा.आमदार थोपटे यांनी उद्घाटनावेळी ग्रामस्थांशी संवाद साधला असता, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही आमदार निधीचा मुत्सद्दे वापर करणार असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने भोर तालुक्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!