ताज्या घडामोडी

महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळ्यात डॉ. मंदार माळी यांचा ‘आयडल ऑफ महाराष्ट्र 2026’ पुरस्काराने सन्मान


लोणंद : लोणंद डिजिटल 24 तास पत्रकार संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळ्यात (१० एप्रिल २०२६) आरोग्य, समाजसेवा व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्हाने गौरव करण्यात आला. फलटण कोरेगाव विधानसभा आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सोहळ्यात बीव्हीजी १०८ ॲम्बुलन्समधील इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ. मंदार माळी (किकवी) यांना राज्यस्तरीय ग्रामीण आरोग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Advertisement

भोर, राजगड, जेजुरी, लोणंद, सासवड, सातारा, पुणे या भागात १०८ ॲम्बुलन्सद्वारे अहोरात्र सेवा देताना डॉ. माळी यांनी अपघात, सर्पदंश, अर्धांगवायू, भुरळ येणे व प्रसूतीसह ६५० हून अधिक प्रसूती व इतर ४,५०० आपत्कालीन रुग्णांना तात्काळ उपचार देऊन प्राण वाचवले आहेत.

पत्रकार संघाने डॉ. मंदार माळी यांचा आयडल ऑफ महाराष्ट्र २०२६’ पुरस्काराने गौरवले. या सोहळ्याने ग्रामीण आरोग्य सेवकांच्या योगदानाबद्दल सन्मान केला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!