मोहरी खुर्द येथे महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ! १४२ नागरिकांची तपासणी
मोहरी खुर्द येथे महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १४२ नागरिकांची तपासणी
मोहरी खुर्द : अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) तसेच समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोहरी खुर्द येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता मोहरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराला मोहरी खुर्द, मोहरी बुद्रुक आणि तेलवडी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये सीबीसी रक्त तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब (बीपी), कोलेस्टेरॉल तपासणी, महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगासंदर्भातील मेमोग्राफी तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, डोळ्यांच्या तपासणीनंतर ६३ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण १४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांचे वैद्यकीय अहवाल संबंधितांना सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमासाठी अनुलोमचे भागजनसेवक ॲड. मंगेश चंद्रशेखर अंबुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच माजी सरपंच सागर पांगारकर, पोलीस पाटील गोरक्षनाथ सुतार, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचेही विशेष योगदान लाभले.


