ताज्या घडामोडी

फरार PSI अनिल चव्हाण यांस तात्काळ अटक करा ! न केल्यास भोर पोलीस स्टेशनसमोर घंटानाद आंदोलनाचा इशारा


वसंत मोरे,
भोर.

भोर : भोर पोलीस स्टेशनचे PSI अनिल चव्हाण यांनी अमानुष मारहाण केल्याने मयूर कुंटे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात मुख्य आरोपी PSI चव्हाण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल आहे. मात्र, ३० दिवस जाऊन ही पोलीस प्रशासनाने त्यांना अटक केली नाही, असा आरोप करत
आयोजक आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटना केला असुन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

.सदर प्रकरणाची तीव्र नाराजी व्यक्त करताना पुणे जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी जिल्हा व तालुका पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. “PSI अनिल चव्हाण यांना तात्काळ अटक करा, अन्यथा शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी भोर पोलीस स्टेशनसमोर घंटानाद आंदोलन करू,” असे पत्रात नमूद केले आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालत असल्याची भावना समाजात निर्माण झाली असून, यामुळे प्रचंड असंतोष वाढला आहे.

आंबेडकरी संघटनेच्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, “सदर आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल.” मयूर कुंटे प्रकरणाने भोर शहरात खळबळ उडाली असून, PSI चव्हाण यांच्या फरारीमुळे पोलीस प्रशासनावर विश्वासार्हतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!