ताज्या घडामोडी

भोरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटात साजरी ! वाचनालय व अभ्यासिकासाठी २.५ कोटी निधी मंजुर


भोर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सामूहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक-शोभारथ, व्याख्यानमाला, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर (निमा), पथनाट्य (अं. नि. स. संघटना), आंबेडकर जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप) आणि भोजन भोज असे विविध कार्यक्रम घेतले गेले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य दिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने ते टिकविले, असा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका बांधण्यासाठी २.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे अभिवादन सभेत जाहीर करण्यात आले. दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून हा निधी मिळवून दिला, असे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे आणि गटनेते केदार देशपांडे यांनी सांगितले.

Advertisement

या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष रणजितदादा शिवतरे, जिल्हा परिषद सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ. अरूण बुरांडे, डॉ. इम्रान खान, डॉ. राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, विद्याधर कांबळे, गौतम शेलार यांसह मान्यवर उपस्थित होते.

भोर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड, श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दीपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके यांनी हे आयोजन यशस्वी केले. प्रास्ताविक मयूर गायकवाड, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!