ताज्या घडामोडी

भोर तालुका बाजार समितीच्या सभापतीपदी सुरेश राजीवडे तर उपसभापतीपदी प्रवीण शिंदे यांची बिनविरोध निवड


भोर : भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी सुरेश राजीवडे व उपसभापतीपदी प्रवीण शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. माजी सभापती आनंद आंबवले व उपसभापती ईश्वर पांगारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. रामबाग येथील बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या या निवडणुकीत निवडणूक अधिकारी आदिनाथ पालवे यांनी जबाबदारी पार पाडली.

सभापतीपदासाठी सुरेश राजीवडे व उपसभापतीपदी प्रवीण शिंदे यांचे एकमेव अर्ज सादर झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली. याप्रसंगी संचालक मंडळातील आनंद आंबवले, ईश्वर पांगारे, धनंजय वाडकर, राजेंद्र शेटे, राजाराम तुपे, अंकुश खंडाळे, भाऊ मळेकर, निलेश सोनवणे, अनिता गावडे, सुरेखा कोंडे, विठ्ठल गोरे, महेश धाडवे, दीपक गायकवाड, शहाजी बोरगे, नवनाथ भिलारे, विनोद खुटवड आदी उपस्थित होते.

Advertisement

नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आला. बाजार समितीच्या स्थापनेपासून माजी मंत्री अनंतराव थोपटे व माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत आहे. त्यांच्याच सूचनेनुसार ही निवड झाल्याचे सांगितले जाते.

सभापतीपदी निवड झाल्यानंतर सुरेश राजीवडे म्हणाले, “माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणार. बाजार समितीला अधिक सक्षम बनविण्यावर भर देऊ.” ही निवड भोर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. बाजार समितीच्या भविष्यातील उपक्रमांकडे सर्वांचे लक्ष राहील असे त्यांनी सांगितले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!