ताज्या घडामोडी

विश्वासाला विकासाची जोड ! उंबरे-खडकी विकास कार्यकारी सोसायटी मतदार प्रतिनिधीपदी गणेशभैय्या खुटवड यांची बिनविरोध निवड


नसरापूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) संचालक मंडळ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील उंबरे-खडकी विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या वतीने संस्था/मतदार प्रतिनिधी म्हणून मा. श्री. गणेशभैय्या सुरेश खुटवड यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ, सहकारी संस्था पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि सर्वसामान्य सभासदांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे गणेशभैय्या खुटवड यांनी अल्पावधीतच विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे उंबरे-खडकी परिसरातील सहकार चळवळीला अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Advertisement

निवडीची घोषणा होताच कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सहकार क्षेत्रातील विविध प्रश्न, शेतकरी व सभासदांच्या हिताचे विषय तसेच विकासाभिमुख उपक्रमांना प्राधान्य देण्याची अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

दरम्यान, या निवडीमुळे भोर तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील प्रतिनिधित्व अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून समस्त ग्रामस्थ मंडळ उंबरे व खडकी तसेच खुटवड मित्र परिवाराने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!