ताज्या घडामोडी

कासुर्डी–शिवापूर मार्गावर बुलेटला हायड्राची धडक ! डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू !! १५ दिवसांनंतर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


खेडशिवापूर : कासुर्डी ते शिवापूर मार्गावर हॉटेल तुळजाभवानी समोर एस.के. हायड्राने रॉयल एनफिल्ड बुलेटला धडक दिल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पार्थिव सारंग बेडगे (वय १९, रा. देवराई, ता. हवेली) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघाताला तब्बल १५ दिवस उलटल्यानंतर राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात हायड्राचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पार्थिव हा कंपनीच्या कामासाठी पॅकिंगचे टेप आणण्याकरिता रॉयल एनफिल्ड बुलेटवरून कासुर्डीकडे जात होता. यावेळी हॉटेल तुळजाभवानीसमोर कासुर्डीकडून शिवापूरच्या दिशेने जाणाऱ्या एस.के. हायड्राचालकाने कोणताही इंडिकेटर न देता अचानक वाहन उजव्या बाजूला वळविले. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या पार्थिवच्या बुलेटला हायड्राच्या पुढील चाकाची जोरदार धडक बसली.

Advertisement

या धडकेत पार्थिव रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मदतीसाठी न थांबता हायड्राचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात पार्थिवचा मृत्यू झाला.

दरम्यान, मृत तरुणाचे वडील सारंग बेडगे यांनी १९ नोव्हेंबर रोजी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात हायड्राचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!