ताज्या घडामोडी

भोर महसूल विभागाची जोरदार कारवाई ! विनापरवाना गौणखनिज वाहतूक करणारे दोन डंपर ताब्यात


 

नसरापूर : भोर तालुक्यात महसुल विभागाच्या भरारी पथकाकडून अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर धडक कारवाई करून ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई कासुर्डी खे.बा. (ता. भोर) परिसरात बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास करण्यात आली. दोन्ही डंपरमध्ये मुरूम व दगड अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या आदेशानुसार तालुक्यातील वेळू, नसरापूर, बारे, हर्णस, निघुडघर, आंबवडे, संगमनेर, किकवी आणि भोर या नऊ मंडलाधिकारी यांच्या भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

या पथकाने नियमित गस्तीदरम्यान कासुर्डी परिसरात दोन हायवा डंपर संशयित अवस्थेत दिसल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत डंपरमधील मुरूम आणि दगडाची वाहतूक विनापरवाना करण्यात येत असल्याचे तसेच चालकांकडील रॉयल्टीची मुदत संपल्याचे आढळले.

Advertisement

महसुल भरारी पथकाने तत्काळ दोन्ही डंपर जप्त करून पंचनामा केला आणि संबंधित अहवाल भोर तहसील कार्यालयात सादर केला. त्यानंतर चालकांना आणि डंपरना राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून डंपर मालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तहसीलदार नजन यांनी माहिती देताना सांगितले की तालुक्यातील सर्व मंडलाधिकारी व भरारी पथकांना अवैध गौणखनिज वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारची विनापरवाना वाहतूक बेकायदेशीर असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. महसुल विभागाकडून या क्षेत्रातील तपासणी मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!