ताज्या घडामोडी

महसूल प्रशासनाकडून शाळकरी मुलांना ओढा ओलांडण्यासाठी तात्पुरता पूल


 

मेटपिला : राजगड (वेल्हा) तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भरून वाहणाऱ्या ओढ्यामुळे जोरकर वस्तीतील शाळकरी मुलांसह नागरिकांचे हाल सुरू होते, ओढा ओलांडणे कठीण झाल्याने मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या परिस्थितीची गंभीर दखल घेत महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट दिली.

Advertisement

वस्तीमधील शाळकरी मुलांना व नागरिकांना सुरक्षितपणे जाण्या-येण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून बांबूंच्या लाकडांचा आधार करून पूल उभारण्यात आला आहे. मात्र कायमस्वरूपी सोयीसाठी पक्का पूल बांधण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.कालपर्यंत धोकादायक असलेल्या या ओढ्यावर आज तात्पुरत्या पुलाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच पक्का पूल बांधण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

महसुल प्रशासनाने ही व्यवस्था करून दिल्याबद्दल शाळकरी मुलं व स्थानिक रहिवाशांनी त्यांचे आभार मानले, व कायमस्वरूपी पक्क्या पूलाचे लवकरात लवकर व्यवस्था करून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!