ताज्या घडामोडी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ! पुणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रवीण ओव्हाळांच्या नेतृत्वात !! संविधान सन्मान दिन मोठया उत्साहपूर्ण वातावरणात साजरा


शिवापूर : खेडशिवापूर येथे संविधान सन्मान दिन साजऱ्याकरिता प्रवीण ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीतील अनेक भीमसैनिक माता-भगिनींसह प्रमुख नेते व मार्गदर्शक उपस्थित होते.

संविधान दिन सोहळ्यात प्रथम संविधान प्रतिमेचे पूजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन व सामूहिक संविधान वाचन करण्यात आले.कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सत्कार सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या हस्ते झाला.

आमदार भिमराव आण्णा तापकीर (खडकवासला), शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख रमेश बाप्पु कोंडे, जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, राष्ट्रवादी नेते विकास नाना दांगट, भोर सभापती अमोल पांगारे, सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) विशाल लोंढे, राजगड पीआय राजेश गवळी, शिवकृपा पतपेढी संस्थापक गोरख चव्हाण यांसह अनेक आजी-माजी सरपंच उपस्थित होते.

Advertisement

सरपंच बंडाभाऊ कोंडे (खेडशिवापूर), स्वप्निल जगताप (खेडशिवापूर), राकेश गाडे (गाउडदरा), स्वप्नाली महांगरे (श्रीरामनगर बांडेवाडी), नवनाथ कदम (किकवी), तुषार कांबळे (खोपी) तांभाड गावचे सरपंच अमोल शिळीमकर,उद्योजक राजु कोंडे यांनी सहभाग घेतला

यावेळी मान्यवरांच्या भाषणानंतर दंगलकार कवी नितीन जी. चंदनशिवे यांचा काव्यमय संवाद कार्यक्रमाने सोहळा रंगत वाढली होती. जितेंद्र कोंडे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष, खेडशिवापूर), अशोक अवतारे (उपसरपंच), अजित कोंडे (ग्रामपंचायत सदस्य), शंकर कोंडे (जय भवानी हॉटेल), शिवराज मिठारे (हॉटेल कैलास बीड), उद्योजक लाडू शेठ कोंडे, सागर आरडी, गजेंद्र कोंडे, मेहेबूब मकांदार यांसारख्या स्थानिक नेत्यांनी उत्साह वाढवला होता.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!