ताज्या घडामोडी

पुणे-बेंगलोर महामार्गावरील भोर तालुक्यातील सारोळे गावात बेवारस महिलेचा मृतदेह आढळला


सारोळा : भोर तालुक्यातील सारोळे गावात विठ्ठल–रखुमाई मंदिर परिसरात बेवारस महिलेचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नन्ना गायकवाड ही ओळखीची नसलेली महिला मंदिराजवळ कोसळलेली आढळली. स्थानिक नागरिक ओंकार महांगरे व साईनाथ धाडवे यांनी तात्काळ १०८ आपत्कालीन सेवेला फोन केला.रात्री सुमारे ११ वाजता १०८ रुग्णवाहिकेचे पायलट विशाल कदम व कर्मचारी मंदार माळी घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांनी महिलेला मयत घोषित केले.

Advertisement

राजगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी साळुंके व इंगळे यांनी तातडीने पंचनामा केला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, भोर येथे पाठवण्यात आला.प्रशासनाने वेगाने कारवाई करून मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विठ्ठल मंदिरासारख्या पवित्र स्थळाजवळ घडलेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे अशा बेवारस व्यक्तींसाठी तात्काळ मदत यंत्रणेची मागणी केली आहे.

पुढील तपास राजगड पोलिस स्टेशनचे निरिक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शना खाली चालु असुन, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होई पर्यंत तपास चालू राहील.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!