ताज्या घडामोडी

मा.आमदार संग्राम थोपटेची पत्रकार परिषद : राजगड कारखान्याला राज्य सरकारची कर्ज हमी जाहीर


 

भोर : भोर, राजगड व मुळशी तालुक्याचे मा.आमदार व राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांच्या अनेक दिवसांच्या अथक परिश्रम व पाठपुराव्याला यश मिळाले आहे. त्यामुळे राजगड सहकारी साखर कारखाना अद्यावत होण्याचा मार्ग सुकर झाल्याने भोर-राजगड तालुक्यातील शेतकरी व कारखाना कामगार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या पर्वात सर्वत्र आनंदाचे वातावरण द्विगुणित झाल्याचे पहावयास मिळते आहे.

राजगड कारखान्याचे नूतनीकरण होणार असल्याने भोर व राजगड तालुक्यातील अर्थचक्र रुळावर येणार आहे. त्याचबरोबर हजारो स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण तरुण वर्गातही उत्साहाचे व नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

Advertisement

मा.आमदार संग्राम थोपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या विनंतीनुसार राष्ट्रीय सहकार विकास निगम (N.C.D.C.) नवी दिल्ली यांचेकडून महाराष्ट्र शासनामार्फत भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लि. अनंतनगर-निगडे, ता.भोर, जि. पुणे या कारखान्यास प्रतिदिन ३५०० मे.टन. गाळप क्षमता प्रकल्प उभारणीसाठी व ६० के.एल.पी.डी. डिस्टीलरी प्रकल्प व १२ मेगावॅट सहवीज प्रकल्प तसेच तसेच ५ टन सी.एन.जी. गॅस प्रकल्प उभारण्याकामी तसेच खेळत्या भांडवलासाठी रक्कम रु. ४६७.७६ कोटी कर्ज उपलब्ध होण्यास महाराष्ट्र राज्य शासनाने कर्ज हमी दिल्याची माहिती त्यांनी भोर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल व तालुक्यातील सर्वच भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी यांचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपटराव सुके व सर्व संचालक तसेच सभासद, शेतकरी, कामगार व आम जनतेच्या वतीने त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

पत्रकार परिषद झाल्यानंतर सर्व संचालक मंडळ व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी मा.आमदार संग्राम थोपटे यांना पेढे भरून त्यांच्या सत्कार केला तसेच कारखान्याचे संचालक, कामगार व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!