ताज्या घडामोडी

भोंगवली-कामथडी गटामध्ये मंडळांना गणेश मुर्ती वाटप ! विक्रमदादा खुटवड युवा मंचचा अनोखा उपक्रम


कापूरहोळ : पांडे, ता.भोर येथे दि. २६ ऑगस्ट रोजी माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे भोर-राजगड-मुळशीचे युवा नेते विक्रमदादा काशिनाथराव खुटवड यांच्या माध्यमातून भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्तीचें वाटप करण्यात आले.

भोंगवली-कामथडी गटामध्ये ५५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती वाटप करण्यात आल्या त्यावेळी पूर्व भागांमधील भोंगवली गणातील मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, सर्वच गणेश मंडळांना मागील ती मूर्ती देण्याचे नियोजन विक्रमदादा खुटवड युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी केले. प्रत्येक गाव मंडळाच्या पसंतीनुसार ज्या मंडळाला दगडूशेठ, लालबागचा राजा,  टिटवाळा, महिरपवाला, हत्ती फर्निचर अशा विविध प्रकारच्या मुर्ती अमर सुपकरांच्या कारखानातून तयार करुन घेण्यात आल्या होत्या.

Advertisement

विक्रमदादा खुटवड युवा मंच भोर-राजगड-मुळशी यांच्या वतीने  नेहमीच समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम तालुक्यामध्ये राबवले जात असतात या उपकरणातून समाजाच्या वेगवेगळ्या घटकापर्यंत पोचून त्यांची सेवा करण्यात येते युवानेते विक्रमदादा खुटवड यांच्या प्रेरणेतून हे उपक्रम राबविण्यात येतात.

गणेश मुर्ती वाटप कार्यक्रम प्रसंगी युवानेते विक्रमदादा खुटवड तसेच युवामंचचे सचिव नथुराम गायकवाड, धनेश डिंबळे, सचिन सोंडकर श्रीकांत जामदार, सचिन सोंडकर, माऊली राऊत, कुमार खुटवड, प्रदीप खुटवड, अमीर बाठे, राहुल गाडे व युवामंचाचे सर्व कार्यकर्ते व भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटामधील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी भोंगवली-कामथडी गटांमधील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी युवानेते विक्रमदादा खुटवड यांचे आभार मानले व त्यांच्या हातुन अशी अनेक समाज उपयोगी कामे होवो व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी श्री चरणी प्रार्थना करण्यात आली.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!