ताज्या घडामोडी

रक्ताच्या नात्यालाच काळिमा ! झोपमोडीच्या रागातून नातवाकडून आजीचा खून !! भोसरी येथील चऱ्होलीतील धक्कादायक घटना


भोसरी : घरातील किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने २५ वर्षीय नातवाने आपल्या ७५ वर्षीय आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजना म्हाडा इमारतीमध्ये गुरुवारी (दि. १७) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून दिघी पोलिसांनी आरोपी नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

माया लक्ष्मण आहिवळे (वय ७५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी साईनाथ नागनाथ थोरात (वय ५०, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, स्वप्निल साईनाथ थोरात (वय २५) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात घाण केल्याच्या कारणावरून माया आहिवळे यांनी स्वप्निलला सुनावले होते. तसेच, तो झोपलेला असताना त्यांच्या सततच्या बोलण्यामुळे त्याची झोपमोड झाली होती. याचा राग मनात धरून स्वप्निलने स्टीलचा तांब्या आजीच्या डोक्यात मारला. त्यानंतर त्यांना जोरात जमिनीवर आपटल्याने गंभीर दुखापत झाली. या मारहाणीत माया आहिवळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!