रोहन बाठे यांच्या संकल्पनेतील २०२६ चे नववर्ष कॅलेंडर ! मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते प्रकाशन !! दिलिपआप्पा बाठे यांचा सामाजिक सेवेचा वारसा कायम
कापूरहोळ : २७ डिसें. (शनिवार) पंचायत समितीचे माजी उपसभापती रोहन बाठे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या वतीने २०२६ चे नववर्ष कॅलेंडर आज कापूरहोळ येथे भव्य सोहळ्यात प्रकाशित झाले. या सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रोहन बाठे यांनी हे कॅलेंडर प्रकाशित करून सामाजिक सेवेचा आपला वारसा पुढे चालु ठेवला आहे.
माजी आमदार संग्राम थोपटे यांनी रोहन बाठे यांचे उल्लेखनीय कार्य अधोरेखित केले. ते म्हणाले, ” कैलासवासी दिलीपआप्पा बाठे ” यांच्या पावलावर पाऊल ठेवून रोहन बाठे सामाजिक सेवेचा वारसा व्यवस्थितरित्या सांभाळत आहेत. राजकारणात अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केले. गोरगरीब, शेतकरी, श्रमिक, अपंग, महिला व आबालवृद्धांसाठी तसेच घरकुल योजना व शासन योजनांद्वारे सातत्यपूर्ण सेवा त्यांनी पुरवल्या आहेत, गेल्या पाच वर्षांतील पंचायत समितीमधील त्यांचे नेतृत्व अजरामर राहील. पुढील राजकीय कारकीर्दीसाठी मनापासून शुभेच्छा.
• संतोष धावले (भाजपा भोर तालुका अध्यक्ष) यांनी रोहन बाठे यांच्या निस्वार्थी सेवेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
• जीवनआप्पा कोंडे (भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष) यांनी सामाजिक सेवेबाबत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
• महेश टापरे (भाजपा युवानेते) यांनी भविष्यातील यशासाठी शुभकामना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
• पोपटराव सुके यांनी यावेळी सांगितले की रोहन बाठे यांच्याकडून सामाजिक सेवेचा वारसा भविष्यातही कायम चालु राहील असा विश्वास व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या.
रोहन बाठे हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध योजना राबवून समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत सेवा पोहोचवली. हे कॅलेंडर प्रकाशन हे त्यांच्या वचन बद्धतेचे प्रतीक आहे. हे कॅलेंडर सामाजिक जागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे मत सर्वांनी व्यक्त केले.
या सोहळ्यास माजी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा उपाध्यक्ष जीवन आप्पा कोंडे, भोर तालुका अध्यक्ष संतोष धावले, पोपटराव सुके, महेश टापरे, चेतन कोंढाळकर, महादेव सोनवणे तसेच भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.




